Thursday, April 15, 2010

मुलनिवासी बहुजन समाजाची स्थिती व गुलामीची समस्या

मुलनिवासी बंधू भगिनिनो,बामसेफ ही गेली 30 वर्षे फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित समग्र सामाजिक क्रांती व व्यवस्था परिवर्ताना करिता कटीबद्ध असलेले व मुलनिवासी बहुजानामधे जागृती-संघटन-नेतृत्व-चळवळ निर्मिती करण्यासाठी अविरत कार्यरत असलेले राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटन आहे. राष्ट्रीय मुलनिवासी संघ हे मुलनिवासी बहुजनांच्या संवैधानिक हक्क-अधिकाराकरिता व्यापक जागृती-आंदोलन करण्यासाठी कार्यरत असलेले सामाजिक संघटन आहे.बामसेफ म्हणजे बॅक्वर्ड अँड माइनोरिटी कम्यूनिटीस एंप्लायीस फेडरेशन. बॅक्वर्ड म्हणजे ओ.बी.सी., एस.सी. व एस. टी. मधे समाविष्ट असलेल्या सर्व जाती. माइनोरिटी कम्यूनिटीस म्हणजे एस.सी. एस. टी. व ओ.बी.सी तून धर्मांतरित झालेला वर्ग (उदा. जैन, लींगायात, बौध, मुस्लिम, शिख, ईसाई, ख्रिस्चन इ.) . बामसेफ ची अशी मान्यता आहे की अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्ग आणि धर्मांतरित वर्ग हा भारताचा मुलनिवासी आहे व बहुसंखेने आहे. या मुलनिवासी बहुजन समाजास बामसेफ संघटित करते.राष्ट्रीय मुलनिवासी संघ बहुजन समाजातील महिला, विद्यार्थी, नवयुवक, व्यावसायिक यांना संघटित करून संवैधानिक हक्क अधिकारासाठी संघर्ष करण्यासाठी व मुलनिवासी बहुजनांचे राष्ट्रव्यापी जनआंदोलन पुर्णनिर्माण करण्यासाठी कटीबद्ध असलेले संघटन आहे.मुलनिवासी बहुजन समाजाची स्थिती व गुलामीची समस्या-मुलनिवासी बहुजन समाज हा जाती-जाती मधे विखंडित-विभाजित आहे. त्यामुळे प्रत्येक जात ही ‘अल्पसंख्यंक’ आहे. या ब्राम्हणवादी व्यवस्थ्येमुळे मुलनिवासी बहुजन समाजामधे विषमता व जाती संघर्ष कायम आहे. ब्राम्हणवादी व्यवस्थ्येने मुलनिवासी बहुजन समाजाला हजारो वर्षे अधिकार वंचित व गुलाम ठेवले आहे. या व्यवस्थ्येमुळे अल्पसंख्यंक ब्राम्हण हा या देशाचा मालक झाला व मुळचे लोक गुलामिचे जीवन जगात आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या व्यापक जनआंदोलना मुळे मुलनिवासी बहुजन समाजाला काही प्रमाणात हक्क अधिकार मिळाले. परंतु आज वर्तमान परिस्थितीत ब्राम्हणी व्यवस्था मुलनिवासी बहुजन समाजाला पुन:अधिकार वंचित व गुलाम बनाविण्यासाठी कार्यरत आहे. मुलनिवासी बहुजन समाजाला गुलाम करण्याकरिता शासक जातीचे लोक ज्या व्यापक षड्यंत्राची अंमलबजावाणी करीत आहेत ते असे-1. शिक्षणाचे खाजगीकरण करणे हा मुलनिवासी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्यचा व जनावराच्या स्तरावर पोहचवण्याचा कार्यक्रम आहे. 2. सेझ ( सेज़- स्पेशल एकनामिक ज़ोन ) च्या माध्यमातून मुलनिवासी बहुजनांचा जमिनीवरचा मालकी हक्क संपविणे व या भूभागाला विदेशी भूभाग घोषित करण्याचे षड्यंत्र. ( फॉरिन स्टेट विदिन सॉवेरेन स्टेट ) 3. मॉलच्या माध्यमातून किरकोळ दुकानदार व त्यावर अवलंबुन एकूण वीस कोटी लोकाना भिकेला लवण्याचे षड्यंत्र.4. सरकारी विभागाच्या खाजगी करणामुळे मुलनिवासी बहुजनांच्या नोकर्‍या संपुष्टात आल्या व नवयुवकामधे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली.5. 52% ओ. बी. सी. ना 27.5% आरक्षण देऊन क्रिमीलेयर लावणे म्हणजे त्याना प्रतिनिधित्व अधिकारापासून वंचित करणे.6. आज भारतात सरकारी रिपोर्ट प्रमाणे 82 कोटी लोक दारीद्र्‍या रेषेखाली जीवन जगत आहेत व त्यातील 25 कोटी लोक भूक बळी रेषेवर आहेत. महागाईमधे प्रचंड वाढ होत असून दर डोइ उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात नाही हे सामूहिक नर संहाराचे षड्यंत्र आहे. 5. आवाहन…शासक जाती मुलनिवासी बहुजन समाजाला गुलाम करण्याचे व्यापक षड्यंत्र राबवत आहेत. याचा मुलगामी परिणाम असा, मुलनिवासी बहुजन समाज हा संविधानिक हक्क-अधिकारांपासून वंचित होऊन त्याची गुलामीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मुलनिवासी बहुजनांच्या स्वातंत्र्‍याकरिता मुलनिवासी बहुजन समाजाचे ध्रुवीकरण करून व्यापक चळवळ निर्माण करण्यासाठी बामसेफ, राष्ट्रीय मुलनिवासी संघ कटीबद्धआहे. या चळवळीचे राष्ट्रव्यापी जनआन्दोलनामधे रुपांतर केल्याने मुलनिवासी बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. लक्षभेदि आणि लक्षप्रेरित जागृत प्रचारक व प्रशिक्षित नेतृत्व निर्माण करणे हा या ब्लॉग चा उद्देश आहे. तरी मुलनिवासी बहुजन समाजातील बंधू-भगिनी-विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या व्यवस्था परिवर्तन कार्यामधे सामील व्हावे, ही विनंती.जय मुलनिवासी.

No comments:

Post a Comment