Thursday, April 15, 2010

मराठा आरक्षण

एकुणच आरक्षणाचा विषय भावनिक पातळीवर पोहचल्याने यासंधर्भात अत्यंत सावधपणे विचार करण्याची गरज आहे। मूळात आरक्षनाची गरज आहे की नाही ? आणि असल्यास ती का आहे व् कोणाला ? या प्रश्नान्चाही विचार प्रामुख्याने केला गेला पाहिजे। आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही।हजारो वर्षे येथील बहुजन समाजावर धर्माच्या नावाने अन्याय अत्याचार चालु आहेत। यातून मराठा समाज ही सुटलेला नाही । वैदिक धर्मानुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण निर्माण करण्यात आले। परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर येथे एकही क्षत्रिय उरला नाही। कलियुगात फ़क्त ब्राम्हण व् शुद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत, असे येथील धर्मशास्त्र सांगते। छ। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातील एकही ब्राम्हण तयार झाला नाही . त्याचप्रमाणे छ . शाहू महाराजाना वेदांचा अधिकार नाकारून ब्राम्हण आणि त्यान्च्यालेखि मराठ्यांची काय किंमत आहे ते दाखवून दिले । शूद्र मानल्यागेलेल्या 85% बहुजन समाजाला शिकायला बंदी घातली गेली. रोटिबन्दि, तटबंदी, भेटबंदी ई. अन्य्ययकारक गोष्टी बहुजन मराठा समाजावर लादण्यात आल्या. हजारो वर्षे ज्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक गळचेपी करण्यात आली त्याना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष संधि देने भाग आहे। अशी संधि म्हणजे त्यांचा अधिकाराच आहे, ते कुणाचे उपकार नव्हेत। हा विचार करुनच राजर्षि शाहू महाराजानी १९०२ साली आपल्या संस्थानात बहुजन समाजाला सरसकट 50% आरक्षणदिले। यात मराठा समाजाचाही समावेश होता। म्हणजे मराठा समाज ही आरक्षणाचा हक्कदार आहे, हे लक्षात येइल। मुळात मागास वर्गाच्या आरक्षणामुळे समाज इतका ढवळून निघत असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार तर दूरच मुख्य प्रश्न आहे तो मानासिकतेचा। आणि ती मानसिकता आहे उच्च वर्णियान्च्या अहंकाराची आणि बहुजनान्च्या न्यूनगंडाची । ही सर्व परिस्तिथि लक्षात घेउन मराठा सेवा संघ व् समविचारी संघटनानी सध्याच्या आरक्षणाला धक्का ना लावता मराठ्याना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। आज काही ब्राम्हण संघटनानिही १०% आरक्षणाची मागणी केली आहे। परंतु मराठ्यांचे आरक्षण आणि ब्राम्हणाचे आरक्षण यात जमीन आसमानाचा फरक आहे। ज्याना पूर्वी संधि नाकारण्यात आली होती अशाना संधि उपलब्ध करून देने हे आराक्षनाचे मुख्य धोरण आहे। ब्राम्हानाना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अथीक, शैक्षणिक आशा सर्वच क्षेत्रात संधि उपलब्ध होत्या। मराठा व् इतर बहुजनाना मात्र अशा संधि नाकारण्यात आल्या होत्या। आज जरी काही मराठे सधन असले तरी अनेक लोक हलाखीचे जीवन जगात आहेत। जर मराठा आरक्षण मंजूर झाले तर मराठ- दलित हे सम्बन्ध ही सुधारातिल। अर्थात मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मराठ्याना आराक्षनाची गरज आहे आणि ती सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्यात आली तरच मराठ्याना न्याय मिळेल। मराठ्यानिहि आरक्षणाचा विचार बुद्धिवदातून केला पाहिजे. शेवटी न्याय मिळवायचा असेल तर प्रस्थापित व्यवस्थेशि संघर्ष केलाच पाहिजे.

No comments:

Post a Comment