Thursday, April 15, 2010

मिरज दंगल

मिरज दंगल


अफजल खानाच्या पोस्टर वरुन उसळलेलि दंगल शमली असली तरी त्याचे दूरगामी परिणाम येथील समाज जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहित . मिरज , जि . सांगली येथील दंगल का झाली याचा ऊहापोह होने गरजेचे आहे । त्यामुळे दंगलिस कारणिभुत ठरलेले अफजल खान वधाचे प्रकरण ज़रा नजरेखालून घालुया . अफजल खान हा आदिल शाहीतील एक बलाढ्य सरदार । तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवारायाना सम्पविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी मं हा राज त्याच्याकडे पाहात होते . या धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बारे वाईट होण्याची शक्यता होती . त्यातच अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कत्यारिने वार केला . परन्तु चिल्खत असल्याने महाराज बचावले व् चपळाइने त्यानी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला . तेवढ्यात राजान्वर धावून आलेल्या सय्यद बंडाला जीवा महालेनी जागेवरच गार केला . हा झाला इतिहास . याला विरोध करण्याचे कारण नाही . परन्तु यापुढे काय झाले ते जाणीव पूर्वक दुर्लाक्षिले गेले आहे । अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायान्वर वार केला . राजानी तो वार चुकाविन्याचा प्रयत्न केला परन्तु कपालावर वार झालाच . महाराजांच्या कपालावर खोल जखम झाली . शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू -ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हाय लाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे मंहापातक अनेक जन आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ? हे शिवाजी राजांचे विचार . मग असे असताना अफजल खानाबरोबर कृष्णा कुलकर्णीचाहि इतिहास समाजासमोर मांडायला हवा , पण तसे होत नाही . जावळीच्या चंद्ररव मोर्यान्साराख्या काही मराठा सरदारांचा स्वराज्याला विरोध होता . मग जावळीच्या मोरेंची जर शिवरायांचे शत्रु म्हणुन मान्डनी केलि जात असेल तर कृष्णा कुलाकर्निकडे केवल ब्राम्हण म्हणुन दुर्लक्ष करायचे का ? तोही स्वराज्याचा शत्रु होता ही बाब अग्रक्रमाने का मांडली जात नाही ?

No comments:

Post a Comment